डहाणूत फटाका कंपनीत भीषण स्फोट, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू (Dahanu ) तालुक्यात एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. या स्फोटामुळे डहाणूत एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे.

विशाल फटाका कंपनीत ( vishal Fireworks Company) भीषण स्फोट झाला आहे. डहाणू हायवेपासून १५ किमी अंतरावर जंगलात ही कंपनी आहे. अचानक झालेल्या स्फोटानं आजूबाजूचा ५ ते १० किलोमीटर अंतरावरील घरांना मोठे धक्के जाणवले.

आगीमुळे धोराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. डहाणू कारखाना आग दुर्घटनेत ५ जखमी त्यातील ४  डहाणू इथल्या दवाखान्यात आणि १ वापी गुजरातला पाठवण्यात आले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१) नवनीत लोटे वय ३२

२) महेश मोरे वय ४०

३) असिफ खान वय ३२

४) प्रेमचंद चव्हाण वय २५

५) सुखदेव सिंग वय ५०

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या