मुंबईतील कुर्ला परिसरातील एका गोडाऊनला आग लागली आहे. मंगळवारी सकाळी ८:४५ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
कुर्ला खाडी नंबर-३, सर्वोदय हॉस्पिटल जवळील गोडाऊनला आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, या आगीच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि ९ फायरवाहन, ६ जम्बो वॉटर टँकर, १ वॉटर टँकर, १ रेस्क्यु वाहन, १ रुग्णवाहिका इत्यादी उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.