‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारा’साठी शिक्षकांमध्येच निरुत्साह, ५० पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या नावाची घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या महापौर शिक्षक पुरस्कारासाठी ५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या ५० महापौर पुरस्कार विजेत्या शिक्षकांची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केली. दरवर्षी हा पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी दिला जातो. परंतु यंदा या पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे शिक्षकांमध्येच कोणता उत्साह दिसत नव्हता. २१९ शिक्षकांकडून अर्ज अपेक्षित असताना केवळ १२७ अर्जच प्राप्त झाले. विशेष म्हणजे या वर्षांपासून आयसीएसई आणि सीबीएसई या शाळांच्या शिक्षकांचा महापौर पुरस्कारासाठी विचार करत १० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आयसीएसई, सीबीएसई शाळांचाही समावेश

दरवर्षी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ सप्टेंबरला शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व खासगी विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. या वर्षांपासून यात आयसीएसई आणि सीबीएसई शाळांच्या शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.

जानेवारीत पुरस्कार वाटप

या पुरस्कारासाठी ९३ महिला आणि ३४ पुरुष याप्रमाणे १२७ शिक्षकांनी महापौर पुरस्कारासाठी नामांकने भरली. त्यातून ५० शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये ३९ महिला आणि ११ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांना जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १० हजार रुपये, महापालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, शाल, व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांपैकी निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या वर्षांपासून आयसीएसई आणि सीबीएसई या शाळांचा विचार करत त्या शाळांमधील शिक्षकांनाही या पुरस्काराने गौरविण्यता येणार आहे. या शाळांमधील १० शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर, उपायुक्त मिलिन सावंत, शिक्षणधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी निवड केलेल्या शिक्षकांची यादी पुढीलप्रमाणे -

नावशाळा
समिक्षा सचिन मुणगेकर

महाराष्ट्र हौ. बोर्ड मनपा, मराठी शाळा

अमृता अशोक पिंपळे

डॉ. स. राधाकृष्णन उ. प्रा. मराठी शाळा

प्रतिमा हेमकांत गोसावी

चारकोप, मराठी शाळा

सुमित्रा सिदू यमगेकर

ना. म. जोशी मनपा मराठी शाळा

आकांक्षा अनिल गोसावी

टेंबीपाडा मनपा मराठी शाळा

मालन अनिल म्हात्रे

चेंबूर नाका मनपा मराठी शाळा

भगवान हरजी भुसारा

कुलाबा मनपा लो. प्रा. मराठी शाळा

प्रतिभा भालचंद्र ढोले

चारकोप गाव, उ. प्रा. मराठी शाळा

मोनिका मिलींद पेडणेकर

कामराजनगर उ. प्रा. मनपा मराठी शाळा

संगीता किशोर म्हात्रे

तुर्भे उ. प्रा. मनपा मराठी शाळा

राजेशकुमार आर. उपाध्याय

भरुचा रोड मनपा हिंदी शाळा

राखी टी. सिंह

मुलुंड कॅम्प मनपा हिंदी शाळा

चेतनारायण आर. मिश्रा

सखाराम तरे मार्ग उ.प्रा. हिंदी शाळा

सुनिलकुमार आर. सिंह

सिद्धार्थ नगर हिंदी शाळा, गोरेगाव

शेख अरिफ शेख रहेमान कुरेशी

शिवाजीनगर मनपा उर्दू शाळा

सय्यद फौजिया कमर अब्बास

देवनार कॉलनी उर्दू गोवंडी

कौसरबानू इब्राहिम शाह

कुरार गाव उर्दू शाळा

मोगल सबीहा राज मोहम्मद

मदनपुरा व्होके मनपा उ. प्रा. उर्दू शाळा

रुपाली पी. देसाई

मनपा गुजाराती शाळा, जोगेश्वरी पश्चिम

प्रियंका प्रशांत कदम

मेघराज शेट्टी मार्ग उ. प्रा. इंग्रजी शाळा

गीता अनिल श्रीवास्तव

आदर्श नगर मनपा उ. प्रा. इंग्रजी शाळा

अनिता डेविड पॉल

देवनार कॉलनी मनपा तामिळ शाळा

सिदलिंगप्पा कासप्पा केशगोंड

राणीसती मार्ग मनपा उ.प्रा. कन्नड शाळा

सुरेखा श्रीनंद सागावकर

मानखुर्द मनपा मराठी शाळा

सचिन शंकर पाटील

लॉर्ड हॅरीस उ. प्रा. मराठी शाळा

संगीता कुसुमाकर सुर्वे

आगरवाडी मनपा हिंदी शाळा

वर्षा सुभाष दांदळे

मालाड कन्या उ. प्रा. मराठी शाळा

प्रभावती शिवराम कोंडा

सोडावाला लेन मतिमंद मुलांची शाळा

सुरेश शंकर आभाळे

विलेपार्ले प. मनपा माध्य. शाळा

सुभाष रामा वाघमारे

एल. के. वाघाजी मनपा माध्य. शाळा

मनिषा मनोज पाटील

सु. प्र. संघाचे मनोहर हरीराम चौगले विद्यालय

ज्ञानप्रकाश मवलाल शर्मा

नूतन विद्या मंदिर प्राथमिक हिंदी शाळा

लता चंद्रकांत गायकवाड

साधना विद्यालय मराठी प्राथ शाळा

राजेंद्र सपंत घाडगे

आय. इ. एस. पाटकर गुरुजी विद्यालय, दादर

गीता नवीनचंद्र शेट्टी

श्रीम. आर. एन. शेठ रत्नचंद्र इंग्रजी शाळा

मीनल रत्नेश मिश्रा

श्रीम. भानुमतीबेन व्ही. गांधी रुषीकुल गुरुकुल इंग्रजी प्राथ. शाळा, घाटकोपर

नैना भरत गाला

केनिया आणि अन्कर इंग्रजी शाळा

आशा संजीव केसकर

आय. इ. एस. चे एशलेन इंग्रजी प्राथ. शाळा

लता रवींद्र करकेरा

एम. व्ही. एम. एस, बीजीपीएस प्राय. स्कूल

रुचिता राजेंद्र बोलाडे

होली फॅमिली हायस्कूल, चेंबूर

लीना सुरेश माने

गोकुळधाम हायस्कूल आणि ज्युनि कॉलेज

रत्ना प्रविण वाईकर

केंद्रीय विद्यालय, कोळीवाडा

स्मृती माधवन

केंद्रीय विद्यालय, कोळीवाडा

प्रिमरोज मिस्किटा

एन. ई. एस. इंटरनॅशनल स्कूल

संगीता राजीव पुरी

चिल्ड्रन्स अकॅडमी हायस्कूल

बार्बोझा निलेट

सेंट मेरी स्कूल

वेदुला वेल्ली शर्मा

सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूल, गोरेगाव

राजलक्ष्मी गोपाळकृष्णन

पलार पब्लिक स्कूल, भांडुप

अर्चना संगम तायडे

एन. ई. एस. नॅशनल पब्लिक स्कूल

कस्तुरी एकनाथ भुतल

कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल

पुढील बातमी
इतर बातम्या