मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर 'परे'चा जम्बोब्लॉक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी 9 जुलै रोजी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे.


मध्य रेल्वे -

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरुन चालवण्यात येईल. परिणामी, या लोकल गाड्या 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच चालवली जाईल.


हार्बर रेल्वे -

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दु. 3.48 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे.
ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येईल. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करू शकतात.


'परे'चा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही धिम्या मार्गांवर रेल्वेकडून दुरुस्तीची कामे करण्यात येतील. त्यामुळे ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जदल मार्गावरील लोकल गाड्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावरुन चालवल्या जातील.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या