वांद्रे वरळी सी लिंकवर अचानक मर्सिडीज थांबली आणि मग पुढे...

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वरळी सी लिंकवर कार पार्क केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मर्सिडीज गाडी असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. 

गाडी अचानक थांबली, ड्रायव्हर आणि इतर प्रवासी बाहेर पडले, पुलाच्या बाजूला उभे राहून फोटो काढू लागले. त्यांचे फोटो दुसऱ्या एका वाहनचालकाने काढला होता, ज्याने ‘आमची मुंबई’ या ट्विटर हँडलवरून वाहतूक पोलिसांना टॅग केले होते.

तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी सी लिंकचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम २८३ अंतर्गत वांद्रे पोलिस ठाण्यात वाहन क्रमांक MH04FW 1*** विरुद्ध एफआयआर नोंदवला. याप्रकरणी एफआयआर नोंदवून पुढील कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या