म्हाडा मुंबईकरांसाठी 600 घरांची लॉटरी काढण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाचे मुंबई मंडळ नवीन वर्षात 600 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबई मंडळाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काढलेल्या सोडतीतील उर्वरित 600 घरांचा या नव्या लॉटरीत समावेश केला जाणार आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या या नव्या लॉटरीत आणखी काही घरांचा समावेश करता येईल का, याची चाचपणीही मुंबई मंडळाने सुरू केली आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात म्हाडाने मुंबईतील 4 हजार 82 घरांसाठी लॉटरी काढली होती. यासाठी 1 लाख 22 हजार अर्जदारांनी घरासाठी अर्ज केले होते. यामध्ये मुंबई मंडळाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) विभागातील 1,947 घरांचा समावेश आहे.

पहाडी गोरेगावमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी 22, 472 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटानुसार अत्यल्प उत्पन्न गटातील 843 घरांसाठी 28,862 अर्ज प्राप्त झाले.

पहिल्यांदाच म्हाडाची नोंदणी करणाऱ्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • या घरासाठी अर्ज करण्यासाठी, म्हाडा गृहनिर्माण लॉटरी वेबसाइट mhada.gov.in वर जावे लागेल.
  • नोंदणी पर्याय निवडा
  • तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती तेथे भरावी लागेल.
  • आधार कार्ड क्रमांक आणि त्याला जोडलेला मोबाइल क्रमांकही द्यावा लागेल.
  • मग तुमच्या कामाची संपूर्ण माहिती द्या जसे पगार किंवा तुम्ही व्यावसायिक आहात की नाही.
  • जर तुम्ही कोटा येथून घर खरेदी करणार असाल तर त्याची माहिती आणि कागदपत्रे एकत्र करा.


हेही वाचा

पालिका 2 जकात नाक्यांचे बस डेपो आणि कमर्शियल हबमध्ये रूपांतर करणार

ठाणे महापालिकेच्या उद्यानांमधील झाडांवर आता QR कोड

पुढील बातमी
इतर बातम्या