म्हाडाकडून घरखरेदीच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

म्हाडाच्या मुंबई (mumbai) गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारितील विविध वसाहतींमधील 118 घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी (lottery system) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

म्हाडाच्या (mhada) संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार आहे.

विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा यात समावेश करण्यात आला आहे. 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर 120 सदनिका विक्री करण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुषंगाने 2 फेब्रुवारी रोजी प्रसिद्धिपत्रक देण्यात आले.

सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 पासून https://bookmyhome.mhada.gov.in/ या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल असे नमूद करण्यात आले होते.

परंतु, तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता नव्याने सदर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध घरांसाठी अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता म्हाडाच्या https://bookmyhome.mhada.gov.in संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/घर निश्चिती करणे या प्रक्रियेला 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे.

विक्री किमतीच्या 10 टक्के रकमेचा भरणा घराच्या निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत अर्ज आवश्यक आहे.


हेही वाचा

मेट्रो लाईन 6 साठी कांजूरमार्ग जमीन हस्तांतरणाला मान्यता

मेट्रो दुर्घटना: वाढीव भरपाईची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या