दिलासादायक! मुंबईच्या किमान तापमानात घट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईच्या तापमानात घट झाली आहे. मागील आठवड्यात वाढलेल्या किमान तापमानात ३ अंशानं घट झाली आहे. तसंच, काही ठिकाणी २० अंश किमान तापमान नोंदविण्यात आले आहेत. मात्र, कमाल तापमानात केवळ एकच अंशाची घट झाली.

गुरुवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार किमान तापमान घटून सांताक्रूझ, पवई इथं २० अंशापर्यंत घसरलंं. तर चारकोप, कांदिवली, मुलुंड इथं २१ अंश किमान तापमान नोंदविण्यात आलं. शहराच्या कमाल तापमानात गेल्या २ दिवसांत फारशी घट झाली नाही.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिना मुंबईतील किमान तापमानाच्या दृष्टीनं अनुकूल असल्याच्या नोंदी आहेत. मागील १० वर्षांतील नोंदींची तुलना केल्यास सर्वात कमी किमान तापमान हे ११.४ अंश असून, २७ डिसेंबर २०११ ला नोंदविण्यात आलं. तसंच किमान तापमानाच्या २० अंशाखालील सर्व नोंदी या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आढळतात.

मागील आठवड्यात तमिळनाडू किनारी झालेल्या निवार चक्रीवादळानंतर राज्यभरात ढगाळ हवामानबरोबरच कमाल तापमानात मोठी घट दिसून आली. मात्र, त्यावेळीदेखील मुंबईच्या कमाल तापमानात मोठी घट झाली नाही. त्या दरम्यान २० अंशावर असलेलं किमान तापमान वाढून २४ अंशपर्यंत पोहोचलं होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या