मीरा-भाईंदर (bhayandar) शहर भविष्यात डिजिटल शहर म्हणून ओळखले जाणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेने “मीरा-भाईंदरला फ्री वायफाय सिटी (free wifi city) बनवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी महापालिका भवनात झालेल्या आढावा बैठकीत याबाबत घोषणा केली.
या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अध्यक्षस्थानी होते, तर महापालिका (mbmc) आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रताप सरनाईक म्हणाले मीरा (mira road)-भाईंदर हे देशातील झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. गेल्या तीन वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1800 कोटी रुपयांची विकासकामे शहरात उभी राहिली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतूनच महाराष्ट्रातील उदयोन्मुख शहरांना ‘फ्री वायफाय’ची जोड देण्याचा महाअभियान सुरू झाले आहे, असेही ते यावेळेस म्हणाले.
मीरा-भाईंदरला ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा मुक्त प्रवेश उपलब्ध करून देणारे हे वायफाय तंत्रज्ञान म्हणजे ‘प्रगतीचा नवा पूल’ असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
शहराच्या निसर्गरम्य रूपरेषेत ‘फ्री वायफाय’ हा आधुनिकतेचा मानाचा तुरा ठरणार असल्याचा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
भविष्यात या निर्णयाचा मीरा-भाईंदर शहराच्या विकासात हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे शहरवासीयांकडून म्हटले जात आहे.
हेही वाचा