मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आरेत अतिरिक्त 7200 चौ.मी. जागा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एकीकडे आरेतील मेट्रो कारशेडला विरोध सुरू असताना दुसरीकडे मात्र महसूल आणि वन विभागाने 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'ला कारशेडच्या 29.79 हेक्टर जागेसोबतच अतिरिक्त 7200 चौ.मी. जागा देण्यास मान्यता दिली आहे.

मुंबई मेट्रो-3 या प्रकल्पाच्या आरे दुग्धवसाहतीमधील कारशेड डेपोसाठी देण्यात आलेली जागा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे बाधित होत असल्याने या विद्युत वाहिन्या आणि पायलॉमन्स स्थलांतरीत करण्यासाठी आरेमधील 7200 चौ.मी. अतिरिक्त जागेची आवश्यकता होती. त्यामुळे आरे कॉलनीतील मौजे परजापूर येथील 7200 चौ.मी. जागा आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

यासंदर्भात 'वनशक्ती' या पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष स्टॅलिन यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेला फसवत आहेत. एका बाजूला आरे मेट्रो कराशेडबाबत जनसुनावणी सुरू असताना राज्य सरकार अशा प्रकारे निर्णय कसा काय घेऊ शकतं? राज्यकर्त्यांना मुंबईतील आरे संपवून टाकायचे आहे. हळूहळू संपूर्ण आरे यांना गिळंकृत करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रविवारी आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये यासाठी आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात मुंबईत रॅली काढण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या