महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष उदय सावंत यांचे सोमवारी निधन झाले . ते 55 वर्षांचे होते. 5 दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना मीरा रोड येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी हजर होते.