मकर संक्रांत बेतली पक्षांच्या जीवावर, १०० हून अधिक पक्षी जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मकर संक्रांतीला लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत पतंग उडवण्याची क्रेझ असते. पण, पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा पक्षांच्या जीवावर बेतत आहे. परळच्या बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी आणि रविवारी अशा २ दिवसांत १०० हून अधिक जखमी पक्ष्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मांजामुळे पक्षी जखमी

मुंबईत ६० हून अधिक पक्ष्यांवर जागच्याजागी उपचार करण्यात आले. पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त कबुतरांचा समावेश असल्याचंही पशुवैद्यकीय रुग्णालयातून सांगण्यात आलं आहे.

संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे अनेक प्रकारचे जखमी पक्षी दाखल होतात. यंदाही १०० हून अधिक पक्षी रुग्णालयात आणण्यात आले. आम्ही त्यांच्यावर तत्काळ उपचार केले. काही प्राणीमित्र देखील रुग्णालयात जखमी पक्षी घेऊन येतात.

- डॉ. जे. सी. खन्ना, सचिव, पशू वैद्यकीय रुग्णालय, परळ

शिवाय, गेल्या काही वर्षांमध्ये जखमी पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचंही डॉ. खन्ना यांनी स्पष्ट केलं.

रुग्णालयात दाखल पक्षी

पक्षीजखमींची संख्या
कबूतर

६२

घारी

बगळा

पोपट

एकूण

 ७३

 

पुढील बातमी
इतर बातम्या