मुंबईतील ९०% पेक्षा जास्त कोविड-१९ बेड रिकामे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोविड-१९ चे रुग्ण आता कमी होत आहेत. शहरात ३०० पेक्षा कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये ९२% खाटा रिकाम्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आकडेवारीनुसार एकूण १५ हजार ५६८8 कोविड बेडपैकी १४ हजार ४२७ रिक्त आहेत. २ हजार १६६ बेडपैकी १ हजार ८०८ बेड आणि ७ हजार ४६४ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.

तथापि, पुढील आठवड्यापासून कोरोनाव्हायरस रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यानं टक्केवारी कमी होईल असं प्रशासनाला वाटते.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, एप्रिलच्या मध्यात बेड वाटपाची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली होती. जेव्हा बीएमसीला कळलं की, रुग्ण थेट त्यांच्या स्त्रोतांद्वारे बेड आरक्षित करतात. तेव्हा त्यांनी प्रणालीचे विकेंद्रीकरण केलं आणि वॉर्ड वॉर रूम स्थापन केल्या.

वॉर्डच्या वॉर रूममधून फोन येत नाही तोपर्यंत कोणत्याही रुग्णाला दाखल करू नये, असं निर्देश त्यांनी रुग्णालयांना दिले आहेत.

सध्या, १ हजार ५०० रुग्ण जंबो कोविड-१९ केंद्रांवर उपचार घेत आहेत. ज्यांना विषाणूची सौम्य ते मध्यम लक्षणे जाणवत आहेत. त्यापैकी २५८ रुग्ण गंभीर आहेत. रुग्णांमध्ये वाढ झाल्यास, त्यांच्याकडे त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी पुरेसे बेड आहेत.

दरम्यान, दिवाळीच्या सणानंतर संसर्ग नियंत्रणात आहे याची खात्री करण्यासाठी पालिका चाचण्या वाढवण्याच्या तयारीत आहे. ते फेब्रुवारी २०२२ मध्ये पुढील सेरोसर्व्हेही करणार आहेत.


हेही वाचा

१०० टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करा - राजेश टोपे

पुढील बातमी
इतर बातम्या