आदिवासी, शेतकरी पुन्हा मुंबईत धडकणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्याने २० हजारहून अधिक आदिवासी, शेतकरी २१ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मुंबईत येऊन धडकणार आहेत. अजूनही विविध मागण्या प्रलंबित असल्याने आदिवासी, शेतकऱ्यांनी विधानभवनला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळेच्या मोर्चात जल विशेषज्ज्ञ राजेंद्र सिंह आणि योगेंद्र यादव देखील सहभागी होणार आहेत.

येत्या १९ नोव्हेंबरपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दरम्यान आपल्या मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी विदर्भ, मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील २० हजार शेतकरी आणि आदिवासींनी मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनही बँकांकडून कर्जमाफी देण्यात येत नाही. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी उत्पन्न मिळत आहे. आदिवासींच्याही वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यामुळे शेतकरी आणि आदिवासींनी सरकारपुढे १५ मागण्या ठेवल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या