गोरेगावमध्ये रिलायन्सच्या टॉवरला विरोध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - मोतीलाल नगरमध्ये एक वर्षापूर्वी रिलायंन्स 4G टॉवर बांधण्यात आला होता. स्थानिक लोकांचा विरोध असून सुद्धा महापालिका आणि गोरेगाव पोलीस यांच्या मदतीने बुधवारी रिलायन्सचे कर्मचारी टॉवर पूर्ण करायला आले होते. कोणतीही परवागी नसताना टॉवरचे काम करताना पाहून स्थानिकांनी विरोध केला.

मोतीलालनगर नंबर 1 या ठिकाणी रिलायन्सने 2015 ला टॉवर उभा केला होता. याचा त्रास सिद्धार्थ हॉस्पिटलमधील रुगणांना आणि स्थानिकांना होणार होता. या दृष्टिकोनातून त्यावेळी मोतीलालनगर रहिवाशांनी आणि सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्यावेळी रिलायन्सने काम बंद केले होते. परंतु रिलायन्स कंपनीने पुन्हा एकदा पोलीस स्वरंक्षण घेत मनपा विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्ता खोदण्याचे काम चालू केले. रहिवाशी रिलायन्स टॉवरच्या विरोधात एकवटले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. परंतु पोलिसांनी प्रथम त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे स्थानिक भलतेच संतापले आणि त्यांनी मोतीलालनगर चौकाजवळ आंदोलन केले. त्यामुळे काहीवेळ वाहतूक ठप्प झाली अशी माहिती रहिवासी संजय अहिरे यानी दिली.

पी/दक्षिण मनपा परिरक्षण विभागातील अभियंते डी. नेमाडे यांनी सांगितले की, या कंपनीकडे आमच्या विभागातून कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. तसेच याची केस कोर्टात चालू आहे. त्यामुळे हे काम थांबवावे असे आदेश मिळताच लगेचच काम बंद करण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या