मुंबई - मध्यप्रदेशमध्ये पोलीस विभागात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक दौलतराम जोगवत लठ्ठपणाच्या उपचारासाठी मुंबईच्या सैफी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर गुरुवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर बॅरिएट्रिक सर्जन डॉक्टर मुफजल लकडावाल यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांचं वजन 180 किलो एवढे होते. पण, आता या वर्षाअखेरपर्यंत ते तब्बल 80 किलो वजन कमी करु शकतील. तसंच त्यांना काही दिवसांतच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.
मुंबई महापालिकेच्या मतदानादिवशी शोभा डे यांनी दौलतरावांचा फोटो ट्विटरवर शेअर करून मुंबईत 'हेवी' बंदोबस्त अशी खिल्ली उडवली होती. त्याला पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शोभा डे यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका देखील झाली होती.