मुंबई विद्यापीठाच्या लाखो गुणपत्रिका पदाच्या चुकीमुळे वाया

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई विद्यापिठात अनेक शाखांचे निकाल 1 मार्चच्या दरम्यान लागले. मात्र विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिका मिळाल्याच नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे गुणपत्रिका छापून तयार आहेत. मात्र गुणपत्रिकेवरील पदाच्या चुकीमुळे लाखो गुणपत्रिका वाया गेल्या आहेत.

मुंबई विद्यापिठाने 2011 साली निगवेकर, काकोटकर आणि ताकवले कमिटीची स्थापना केली. या कमिटीने महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट तयार केला. या कायद्यासाठी अनेक बैठका, चर्चा झाल्या. त्यानंतर भाजपा सरकारने हा कायदा पास केला आणि 1 मार्च 2017 पासून या कायद्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. या कायद्यानुसार विद्यापिठातील अनेक पदं बदलण्यात आली. काही पदं वगळण्यात देखील आलीत. तर प्राध्यापकांची सिनेटपदं कमी देखील करण्यात आली. याचवेळी अनेक संचालकांच्या संख्याही वाढवण्यात आल्या आहेत. 1994 च्या कायद्यानुसार विद्यापिठाच्या गुणपत्रिकेवर 'कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन'ची सही असायची. मात्र 1 मार्चपासून लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्ससिटी या कायद्यानुसार या पदाचे नाव 'डायरेक्टर ऑफ एक्झॅमिनेशन'मध्ये असे करण्यात आले. मात्र गुणपत्रिका आधीच तयार असल्यामुळे गुणपत्रिकेवर 'कंट्रोल ऑफ एक्झॅमिनेशन' हे पद आहे. त्यामुळे या गुणपत्रिका विद्यार्थांना दिल्याच नाहीत. विद्यापिठाच्या या अनागोंदी कारभारामुळे लाखो गुणपत्रिका आता वाया जाणार आहेत.

दरम्यान, लवकरच गुणपत्रिकांवर 'कंट्रोल ऑफ एक्झॅमिनेशन'ऐवजी 'डायरेक्टर ऑफ एक्झामिनेशन' हे पद बदलून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रिका मिळतील आणि विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती विद्यापिठाचे रजिस्ट्रार एम.ए.खान यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या