मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो 24 जुलैपासून धावणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो मार्ग 3, ज्याला एक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते, 24 जुलैपासून मेट्रो 3ची सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ट्विटरवर दिली. (Mumbai Metro will start from 24 july)

भाजपचे नेते विनोद तावडे यांनी या संदर्भात एक ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये विनोद तावडे यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याची हमी दिली होती आणि ती आता पूर्ण होत आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो (Aqua Line) 24 जुलैपासून सुरू होत आहे. ही मेट्रो लाईन शहराला नवी उभारी देणार आहे."

मेट्रो 3 मार्गातील स्टेशन्स

  • कफ परेड
  • विधानभवन
  • चर्चगेट
  • हुतात्मा चौक
  • सीएसएमटी मेट्रो
  • काळबादेवी
  • गिरगाव
  • ग्रँट रोड
  • मुंबई सेंट्रल मेट्रो
  • महालक्ष्मी
  • सायन्स म्युझियम
  • आचार्य अत्रे चौक
  • वरळी
  • सिद्धिविनायक
  • दादर
  • शितलादेवी
  • धारावी
  • बीकेसी
  • विद्यानगर
  • सांताक्रूझ
  • डोमेस्टीक एअरपोर्ट
  • सहार रोड
  • इंटरनॅशनल एअरपोर्ट
  • मरोळ नाका
  • एमआयडीसी
  • सीप्झ आणि आरे डेपो

कसे असेल मेट्रो 3 मार्गावरील मेट्रोचं वेळापत्रक?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रोची सेवा सकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. भूमिगत मेट्रोचा स्पीड 90 किमी प्रति तास इतका असणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्या ठराविक काळानंतर सुरू राहणार आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा 33.5 कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे
  • या मार्गावर 27 स्थानके असून त्यापैकी 26 भुयारी तर एक जमिनीवर आहे.
  • या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.
  • इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील 15 % प्रवासी मेट्रो-3 कडे वळतील.
  • सन 2041 पर्यंत मेट्रो-3 मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन 6.65 लाखाने घट होईल.
  • या मार्गामुळे दरवर्षी 2.61 लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.

पहिला टप्पा : आरे ते बीकेसी

  • एकूण स्थानके या मार्गावर 10 स्थानके असून त्यापैकी 9 भुयारी तर एक जमिनीवर आहे.
  • अंतर 12.44 किमी
  • दोन गाड्यांमधील कालावधी 6.5 मिनिटे
  • पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या 9 गाड्या

दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड

  • एकूण स्थानके 17
  • अंतर 21.35 कि.मी.
  • दोन गाड्यांमधील कालावधी 3.2 मिनिटे
  • दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या 22 गाड्या


पुढील बातमी
इतर बातम्या