'या' महामार्गांवर 4 हाय-स्पीड ईव्ही मेगाचार्जर

भारतातील सर्वात मोठी चारचाकी वाहने उत्पादक आणि भारतातील ईलेक्ट्रिक वाहन (EV) क्रांतीतील प्रणेते असलेल्या टाटा.ईव्हीने पुणे (pune) -नाशिक महामार्गावर टाटा.ईव्ही मेगाचार्जरचे उद्घाटन करून ईलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा मिळण्याबाबत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

हा उपक्रम कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये ओपन कोलॅबोरेशन 2.0 फ्रेमवर्क अंतर्गत 2027 पर्यंत भारतातील सध्याची चार्जिंग पायाभूत सुविधा दुप्पट करून 4,00,000 चार्जिंग पॉइंट्सपर्यंत पोहोचवण्याच्या घोषणा केलेल्या उपक्रमाशी सुसंगत आहे.

मुंबई (mumbai) -अहमदाबाद महामार्ग (Mumbai-Ahmedabad Highway)

वडोदरा (श्रीनाथ फूड हब), वापी (शांती कॉम्प्लेक्स) आणि घोडबंदर (हॉटेल एक्सप्रेस इन) येथील तीन चार्जर हाय-स्पीड चार्जिंग सुविधा प्रदान करतात. उल्लेखनीय म्हणजे, वडोदरा स्टेशनमध्ये 400 किलोवॅटचा फ्लॅगशिप चार्जर आहे जो एकाच वेळी सहा वाहने चार्ज करू शकतो आणि फक्त 15 मिनिटांत 150 किमी रेंज देऊ शकतो.

पुणे-नाशिक महामार्ग (Pune-Nashik Highway)

पुणे-नाशिक (nashik) महामार्गावरील आकाश मिसळ हाऊस हे या वर्दळीच्या मार्गावरील ईलेक्ट्रीक वाहन प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे आणि उल्लेखनीय चार्जिंग स्टेशन (charging stations) आहे.

पुण्यापासून 60 किमी आणि नाशिकपासून 160 किमी अंतरावर असलेले आणि चार्ज झोनद्वारे चालवले जाणारे हे टाटा.ईव्ही मेगाचार्जर जलद चार्जिंगची आवश्यकता असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सोयीस्कर आहे.

चार्जर, जलद चार्जिंग गती आणि विश्वासार्हतेबद्दल ईव्ही मालकांच्या चिंता दूर करण्यासाठी, टाटा.ईव्हीने देशभरात हाय-स्पीड, विश्वासार्ह चार्जिंग स्टेशनचे सह-ब्रँडेड टाटा.ईव्ही मेगाचार्जर नेटवर्क तयार करण्यासाठी चार्जझोनशी भागीदारी केली आहे.

हे टाटा.ईव्ही मेगाचार्जर सर्व ईलेक्ट्रिक वाहनांसाठी उपलब्ध असतील परंतु टाटा वाहनांसाठी वापरकर्त्यांना काही विशेष फायदे मिळतील.


हेही वाचा

ठाण्यात तृतीयपंथीयांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग

ठाण्यातील 'या' भागांमध्ये 12 तासांचा पाणीपुरवठा बंद

पुढील बातमी
इतर बातम्या