दादर (पश्चिम) (dadar) येथील 46 वर्षे जुन्या 'वीर सावरकर महानगरपालिका मार्केट'च्या नूतनीकरणासाठी (renovation) बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) 2.94 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
एका संरचनात्मक तपासणीत (स्ट्रक्चरल ऑडिट) ही इमारत 'C-2' (धोकादायक) श्रेणीत असल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव आता स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
या नूतनीकरणाचा उद्देश जीर्ण झालेल्या मार्केटचा (veer savarkar market) कायापालट करणे आणि व्यापारी व ग्राहकांसाठी सुरक्षितता वाढवणे हा आहे.
नियोजित कामांमध्ये काँक्रीटचा नवीन पाया (फाउंडेशन) घालून इमारतीची संरचना बळकट करणे, स्टील व लाकडी ट्रसच्या आधारे 'गॅल्व्हॅल्यूम' (Galvalume) शीटचे नवीन छत बसवणे, पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांची (गटर्स) दुरुस्ती करणे, तसेच विद्युत यंत्रणा, प्लंबिंग आणि सांडपाणी निचरा प्रणाली अद्ययावत करणे यांचा समावेश आहे. यासोबतच रंगकाम, फरसबंदी, विटांचे काम आणि प्लास्टरिंगची कामेही केली जाणार आहेत.
या प्रकल्पात लोखंडी दरवाजे व संरक्षक जाळ्या बसवणे, जुने दरवाजे व खिडक्या बदलणे, स्टील फॅब्रिकेशनची कामे, वाळवी प्रतिबंधक उपाययोजना आणि पाण्याची नवीन ओव्हरहेड टाकी बसवणे यांसारख्या कामांचाही समावेश आहे.
दादर (पश्चिम) येथे स्थित असलेले 'वीर सावरकर महानगरपालिका मार्केट' गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून नागरिकांची सेवा करत आहे.
विक्रेते आणि नागरिक यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासोबतच, मार्केटची संरचनात्मक स्थिरता सुधारणे आणि त्याचे आयुर्मान वाढवणे हा या नूतनीकरणाचा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा