मुंबई : कोस्टल रोड १ नोव्हेंबर २०२३ पासून खुला होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईला वाहतूक समस्येपासून वाचवण्यासाठी पालिकेने कोस्टल रोड प्रकल्प सुरू केला. आता लवकरच मुंबईकरांसाठी कोस्टल रोड सुरू होणार आहे. कोस्टल रोडचे मुंबईकरांचे स्वप्न दिवाळीपूर्वी पूर्ण होणार आहे. BMC आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी माहिती दिली आहे की हा मार्ग 1 नोव्हेंबर 2023 पासून सेवेत असेल.

कोस्टल रोड योजनेचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून त्यासाठी सुमारे साडेबारा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत 10.5 किमी आहे. कोस्टल रोड योजनेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीही बऱ्याच अंशी कमी होणार आहे. मुंबईतील सागरी मार्गावर तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर अवघ्या 8 मिनिटांत कापता येणार आहे.

विशेष म्हणजे प्रवाशांना टोलची रक्कम भरावी लागणार नाही. कोस्टल रोडचा पहिला टप्पा वांद्रे-वरळी सी लिंक ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा असेल, त्यात बोगदा आणि समुद्रातून रस्ता असेल. यासोबतच समुद्रावर पूल बांधण्यात येणार आहे. तसेच या मार्गावर दोन बोगदे आहेत.

हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत दोन किलोमीटर लांबीचे आहेत. यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. प्रियदर्शनी पार्क येथील बोगद्यातून रस्ता थेट मरीन ड्राइव्हकडे जातो. म्हणजेच या बोगद्यातून आत गेल्यास काही मिनिटांत मरीन ड्राइव्हला पोहोचता येईल.


हेही वाचा

मुंबई मेट्रो लाइन 9 पुढील वर्षी सुरू होऊ शकते

सीएसएमटी ते कर्जत गाठता येणार २० मिनिटांत, रेल्वे कॉरिडॉरचे काम जोमात

पुढील बातमी
इतर बातम्या