मुंबई ते दिघी आणि काशिद रो-रो सेवा मार्चपर्यंत सुरू होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईकरांचा कोकण प्रवास आरामदायी बनवणाऱ्या मुंबई-दिघी (mumbai dighi) आणि मुंबई-काशिद (mumbai kashid) रो-रो सेवा मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्देश दिले आहेत.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, महाराष्ट्र (maharashtra) सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आणि इतर संबंधित अधिकारी बैठकीत उपस्थित होते.

दिघी आणि काशिद या दोन्ही ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम जलदगतीने करण्याचे निर्देश देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, मुंबईहून (mumbai) कोकणात जाण्यासाठी रो-रो सेवा (roro ferry) हा एक उत्तम पर्याय असेल.

या सेवेमुळे वेळेची बचत होईल. त्यामुळे या योजनेचे काम जलदगतीने करावे. जेट्टीचे काम सुरू असताना इतर परवानग्यांसाठी प्रस्ताव पाठवावेत आणि मंजुरी घ्यावी. ही सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत. असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

दरम्यान, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत मासेमारी बोटींना देण्यात येणाऱ्या डिझेल परतफेडीबाबत बैठक झाली. कोणत्याही पात्र मासेमारी बोटीला डिझेल परतफेड नाकारली जाणार नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत सांगितले.

तसेच, मासेमारी संघटनांनी त्यांच्या बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. मच्छीमारांसाठी या संदर्भात समाधानकारक निर्णय घेण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.


हेही वाचा

मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून जड वाहनांना बंदी

स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील 15 सरपंच उपस्थित राहणार

पुढील बातमी
इतर बातम्या