गणेशोत्सवात मुंबईत डीजेवर बंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे गावखेड्यापासून ते शहरापर्यंत गणेशाचे आगमन धामधुमीत आणि जल्लोषात केले जाणार आहे.

राज्यात (maharashtra) गणेशोत्सवादरम्यान (ganeshotsav) आगमन आणि विसर्जनाच्या वेळेस मोठमोठ्याने डीजे लावण्यात येतात. या डीजेच्या (DJ) गाण्यावर अनेकजण नाचत गणेशाला स्वागत तसेच निरोप देतात. यावेळी कानठाळ्या बसतील इतक्या मोठ्या आवाजात हे डीजे वाजवले जातात.

म्हणूनच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी घालण्याचा मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाचा आदेश मुंबई पोलिसांनी (mumbai police) अंमलात आणला आहे.

या निर्देशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनीची पातळी 50 डेसिबलपर्यंत मर्यादित आहे आणि मिरवणुकीत फक्त पारंपारिक वाद्ये वाजवण्यास परवानगी आहे.मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक गणेश मंडळांना विसर्जनादरम्यान डीजे वापरू नयेत असे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले आहे की ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, 2000 अंतर्गत, वैयक्तिक लाऊडस्पीकरना 55 किंवा 45 डेसिबलच्या निर्धारित ध्वनी पातळीपेक्षा जास्त आवाज निर्माण करणे बेकायदेशीर आहे, ज्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये एकत्रित उल्लंघन होते.


हेही वाचा

मुंबईतील डबेवाला संग्रहालयाचे गुरुवारी उद्घाटन

दादर कबुतरखाना बंदीनंतर 'या' नवीन ठिकाणी खाणे टाकले जातेय

पुढील बातमी
इतर बातम्या