मुंबईत 431 ठिकाणी फ्लडिंग पाईट आहेत. आता त्यात 130 नवीन फ्लडिंग पॉइंटची भर पडली आहे.
मुंबईत (mumbai) सद्यस्थितीत एकूण 561 फ्लडिंग पॉइंट आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा धोकादायक प्रवास कायम आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने (bmc) कंबर कसली आहे.
पश्चिम उपनगरात सर्वाधिक 191 फ्लडिंग पॉइंट असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात नवीन फ्लडिंग पॉइंट तयार होत असतात, परंतु मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका योग्य ती खबरदारी घेत असते.
यंदाही मुंबईत ठिकठिकाणी पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
पुढील दोन ते अडीच महिन्यांनंतर वरुणराजाचे आगमन होणार आहे. मार्च महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरी नालेसफाईच्या कामाला वेग आलेला नाही.
तसेच मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच पुढे आलेले नाहीत. त्यातच मुंबईत ठिकठिकाणी फ्लडिंग पॉइंट्स असल्याने मुंबई जलमय (flood) होण्याचा धोका वाढला आहे.
पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा व्हावा, यासाठी मुंबईत ठिकठिकाणी उच्च क्षमतेचे 547 पंप बसवण्यात येत आहे.
मात्र रस्ता खचणे, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे झाडांच्या फांद्या कोसळणे, उघड्या मॅनहोलचा धोका कायम असताना 561 फ्लडिंग पॉइंटचा धोका यंदा कायम आहे.
पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एकूण 547 पंप बसवण्यात येणार आहेत.
ताशी 60 क्यूबीक मीटर ते 1 हजार क्यूबीक मीटर क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा