मुंबईची पिंगळा मोरे 'डुडल फाॅर गुगल'ची विजेती, मिळाली ५ लाखांची स्काॅलरशीप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईची १३ वर्षांची पिंगळा राहुल मोरे हिला गुगलच्या 'डुडल फाॅर गुगल' काॅम्पिटीशनची विजेती घोषित करण्यात आलं आहे. पिंगळा आठवीची विद्यार्थीनी असून ५ विविध ग्रुपमधील प्रतिस्पर्ध्यांमधून विजेती ठरली आहे. तिने बनवलेलं डुडल १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या निमित्ताने गुगलच्या होमपेजवर झळकलं.

७५ हजार लहानग्यांचा समावेश

गुगलने 'डुडल फाॅर गुगल' काॅम्पिटीशनसाठी विद्यार्थ्यांकडून चित्रं रेखाटून मागवली होती. या चित्राची थीम होती 'व्हाॅट इन्स्पायर्ड मी' म्हणजेच माझा प्रेरणास्त्रोत काय? या काॅम्पिटीशनमध्ये देशभरातून ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यांत पहिलीपासून १० वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

विजेत्याला ५ लाख रुपयांची स्काॅलरशीप, २ लाख रुपयांचं टेक्नाॅलाॅजी पॅकेज आणि गुगलच्या आॅफिसची ट्रिप अनुभवायला मिळणार आहे.

अाकाशगंगेचं सौंदर्य

गुगलने पिंगळाचं चित्र बालदिनाच्या दिवशी डुडल म्हणून निवडलं. या चित्रात एक लहान मुलगी टेलिस्कोपमधून आकाशातील तारे बघताना दिसत आहे. या डुडलवरून लहान मुलं आकाशगंगेपासून सर्वाधिक प्रेरीत होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

गुगलने निवडलेल्या इतर चित्रांमध्ये बंदर, शेतकरी, स्टडी डेस्क इत्यादी चित्रांचा समावेश आहे. या चित्रापैकी विजेतं चित्र निवडण्यासाठी गुगलने ६ आॅक्टोबरपासून व्होटिंग सुरू केली होती.

गुगलने 'डुडल फाॅर गुगल इंडिया'ची सुरूवात २००९ मध्ये केली होती. माय इंडिया नावाचं डुडल ही डुडलची सर्वात पहिली थीम होती.

पुढील बातमी
इतर बातम्या