मुंबईच्या रूग्णालयांमध्ये लंडनपेक्षा जास्त गोंगाट!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या रुग्णालय परिसरात ध्वनिप्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमायरा अब्दुलाली यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई आणि उपनगरातील खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालय परिसरात आवाजाचे प्रमाण खूप आहे.  

 

आवाज फाऊंडेशनच्या सर्व्हेनुसार हिंदूजा आणि केईएम रुग्णालय परिसरात जवळपास 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यासंबंधी ठोस कारवाई करावी अशी मागणी आवाज फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. यावेळी सुमायरा यांनी मुंबईतल्या रुग्णालयातील आवाजाची तुलना लंडनच्या काही रुग्णालयांतील आवाजाशी केली आहे.


रुग्णालय परिसरातील आवाज (डेसिबलमध्ये)

मुंबई
लंडन
रस्त्यावरील रुग्णवाहिका
100
रस्त्यावरील रुग्णवाहिका
94
हिंदुजा
100.5
रॉयल लंडन
82
केईएम
100.3
सेंट थॉमस
81
वाडिया
99.6
सेंट मेरी
79
होली फॅमिली
97.4
लंडन क्लिनिक
76
सायन
97.3
यूसीएच
62
लिलावती
95.1
-
-


रुग्णालयाबाहेरील वाहतुकीमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याचे 'आवाज फाऊंडेशन'ने म्हटले आहे. विशेषत: वाहनांच्या भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढत असून, याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी 'आवाज फाऊंडेशन'कडून करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या