लसीचे २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मान्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासास मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना याबाबत घोषणा केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद करण्यात आला. त्यामुळं अनेकांना प्रवासास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळं अनेक स्थानिक नेते, प्रवासी संघटना आणि प्रवासी यांनी लोकल प्रवास सुरु व्हावा यासाठी आंदोलन केले. शिवाय विरोधी पक्षानही लोकल सूरु करण्याची मागणी धरून ठेवली होती. 

आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल

पुढील बातमी
इतर बातम्या