मुंबई : मलबार हिलमधील वीजपुरवठा खंडित

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मलबार हिलमध्ये  मंगळवार, 10 मे रोजी उशिरा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. या परिसरात 10.40 वाजता वीजपुरवठा खंडित झाला.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) च्या प्रवक्त्याने फीडरमध्ये बिघाड झाल्यामुळे मलबार हिल परिसरात बत्ती गुल झाल्याचं स्पष्ट केलं. पुरवठा पूर्ववत करण्यासाठी एक पथक घटनास्थळी काम करत आहे.

पीआरओने मंगळवारी रात्री 10.50 वाजता स्पष्ट केले, "मुंबईतील मलबार हिल परिसरात फीडरच्या बिघाडामुळे पुरवठा बंद आहे. पुरवठा पूर्ववत करण्यासाठी एक टीम साइटवर काम करत आहे." या परिसरात बेस्टकडून विद्युत पुरवठा केला जातो.

तत्पूर्वी, सोमवारी, 9 मे रोजी सायंकाळी उशिरा, तांत्रिक बिघाडामुळे उपनगर आणि दक्षिण मुंबईच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री 8.35 च्या सुमारास बिघाड झाल्यानंतर पाच मिनिटांत पुरवठा पूर्ववत झाल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. कारण मागणी वाढली असताना कोळशाचा पुरवठा मर्यादित झाला आहे. मात्र, या दरम्यान मुंबईवर फारसा परिणाम झालेला नाही.

तथापि, कोळसा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे राज्यात काही प्रमाणात लोडशेडिंग अपरिहार्य आहे, असे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.


हेही वाचा

जनरल करिअप्पा फ्लायओव्हरचे बांधकाम 25 मे पर्यंत पूर्ण होईल, पालिकेचे आश्वासन

पुढील बातमी
इतर बातम्या