मुंबईत 10 टक्के पाणी कपातीची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

यंदा मुंबईत कमी पाऊस झाल्याने त्याची झळ मुंबईकरांना सोसावी लागणार आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी कपातीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यादरम्यान मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10 टक्के पाणी कपात

यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने मुंबईत पाणी कपात जाहीर होण्याची शकत्या आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत जवळपास 10 टक्के पाणी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावांतील एकूण नऊ टक्के पाणीसाठा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं यामुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

तलांवमीधल पाणीसाठा कमी

मुंबईला वर्षभर पाणी पुरवण्यासाठी तलावांमध्ये 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणी असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी पावसाची नोंद कमी झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवमीधल पाणीसाठा दोन लाख दशलक्ष लीटरपेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठा आता 10 टक्के कमी करण्यात येणार आहे. आता स्थायी समितीकडून पाणी कपात कधी लागू होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या