मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो लाईन-3 वर मासिक प्रवास पासवर 25 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा जवळपास दहा दिवसांत लागू होणार आहे.
दिव्यांग प्रवाशांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दिपक कैतके यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. कैतके यांनी काही आठवड्यांपूर्वीच मुंबई मेट्रो प्रशासन व राज्य शासनाकडे दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात सवलत देण्याची मागणी केली होती.
दिपक कैतके यांनी ट्विटरवर काय म्हटलंय?
त्यांच्या या मागणीला अखेर मेट्रो प्रशासनाने दुजोरा देत सवलतीची घोषणा केली आहे. तरीदेखील, कैतके यांनी आता दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन सवलत टक्केवारीनुसार वाढवावी अशी नव्याने मागणी केली आहे.
कैतके यांनी मुंबई मेट्रो 3 (MumbaiMetro3) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक्सवर टॅग करत म्हटलंय, "महोदय, दिव्यांग प्रवाशांना मिळणारी सवलत त्यांच्या दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार निश्चित करण्यात यावी, ही नम्र विनंती आहे. मेट्रो 3 अद्याप पूर्णपणे सुलभ नसल्याने प्रवासासाठी सहकारी घ्यावा लागतो. त्यामुळे कृपया किमान 50 टक्के सवलत देण्याचा विचार करावा.”
मेट्रो लाईन-3 अद्याप पूर्णपणे दिव्यांगसुलभ नसल्याने प्रवासासाठी सहाय्यक घ्यावा लागतो. त्यामुळे केवळ 25 टक्क्यांची सवलत अपुरी ठरत असल्याचे मत दिव्यांग प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा