मुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्य (maharashtra) सरकारने मेट्रोचे भाडे निर्धारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे मेट्रोचे (metro)भाडे आगामी काही महिन्यांत वाढण्याची शक्यता अधिक झाली आहे.

ही भाडेवाढ अंधेरी (प.)–दहिसर (dahisar) मेट्रो 2A आणि गुंदवली–दहिसर मेट्रो 7 मार्गिकेसाठी लागू होऊ शकते. एमएमआरडीएने (mmrda) भाडे निर्धारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मागील ऑगस्टमध्येच राज्य सरकारकडे पाठवला होता.

राज्य सरकारने गेल्या महिन्यात या प्रस्तावाला मंजुरी देत तो केंद्र सरकारच्या सॉल्ट पॅन विभागाकडे पाठवला आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होणार आहे.

सध्या एमएमआरडीएच्या मेट्रो 2A आणि 7 मार्गिकांवर 3 ते 12 किमी अंतरासाठी 20 रुपये भाडे आकारले जाते.

भुयारी मेट्रोचे भाडे या सर्व मार्गिकांमध्ये सर्वाधिक असून 8 ते 12 किमी अंतरासाठी 40 रुपये आकारले जातात. मेट्रो 1 वरही 8 ते 11.4 किमी अंतरासाठी भाडे 40 रुपयेच आहे.

एमएमआरडीएच्या (MMRDA) मेट्रो मार्गिकांवरून सध्या दररोज 3 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी प्रवासी संख्या 9 लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षा होती.

प्रत्यक्ष संख्येत मोठे अंतर असल्याने मेट्रोलाईन्सचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी आहे, तर खर्च सतत वाढत आहे. परिणामी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

याशिवाय, मुंबईतील (mumbai) इतर मेट्रो मार्गिकांचे भाडे एमएमआरडीएच्या मार्गिकांपेक्षा अधिक आहे. या विसंगतीमुळे आणि वाढत्या तुटीमुळे मेट्रो 2A व 7 मार्गिकांच्या भाडेवाढीसंदर्भात प्रशासन गंभीरपणे विचार करत असल्याचे समोर येत आहे.


हेही वाचा

18 वर्षीय तरुणीच्या मतदार नोंदणीचा पुनर्विचार करण्याचा आदेश

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा भयंकर फटका!

पुढील बातमी
इतर बातम्या