खार कोळीवाड्यात आग, 2 मुलांसह 6 जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

खार कोळीवाड्यात सोमवार, 15 मे रोजी सकाळी 8.45 च्या सुमारास आग लागून सहा जण जखमी झाले. आग विझवण्यासाठी आणि अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन विभाग रुग्णवाहिका, पोलिसांसह घटनास्थळी पोडोचली आहे. 

सकाळी ९.१९ च्या सुमारास आग विझवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गॅस गळतीमुळे आग

गॅस गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिवाय, जखमींना पुढील उपचारासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सहा जखमी ICU मध्ये दाखल

सखुबाई जैस्वाल (65) 45 टक्के भाजल्या

प्रियंका जैस्वाल (26) 51 टक्के भाजल्या

निकिता मंडलिक (26) या 45 टक्के भाजल्या

सुनील जैसवाल (29) 50 टक्के भाजल्या 

यश चव्हाण (07) 40% तर प्रथम जैस्वाल (06) 45% भाजल्या आहेत. या सर्वांना आयसीयू आणि पीआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


हेही वाचा

मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार

परळ टीटी उड्डाणपूल 'या' तारखेपर्यंत बंद, वाहतूक वळवली

पुढील बातमी
इतर बातम्या