मुंबईचा समुद्र खवळणार! पुढील पाच दिवस मोठ्या भरतीचे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

समुद्राला 24 जून ते 28 जूनपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 19 वेळा समुद्राला मोठी भरती असेल, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

यामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे. समुद्राच्या भरतीवेळी मोठा पाऊस झाल्यास अनेक ठिकाणे जलमय होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या दिवशी काळजी घ्या

जून 2025 (लाटांची उंची मीटर्समध्ये)

24 जून : स. 11.15 वा-लाटांची उंची 4.59 मी

25 जूनः दु. 12.05 वा-लाटांची उंची 4.71 मी

26 जूनः दु. 12.55 वा-लाटांची उंची 4.75 मी

27 जूनः दु. 1.40 लाटांची उंची 4.73 मी

28 जूनः दु. 2.26 वा-लाटांची उंची 4.64 मी

मुंबईत गेल्याकाही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा घाटात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ न जाण्याचे मुंबई पालिकेचे आवाहन. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा

गोराई: खारफुटी उद्यान ऑगस्टमध्ये सुरू होणार

कुर्ला आणि भांडुपमधील रहिवाशांना पाणी उकळून पिण्याचे निर्देश

पुढील बातमी
इतर बातम्या