सर्व मेट्रो मार्गांची MMRDA कडून तपासणी होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मेट्रो 4चा स्लॅब कोसळण्याच्या घटनेनंतर एमएमआरडिएने (MMRDA) ने सर्व मेट्रो मार्गांची सखोल तपासणी सुरू केली आहे. उद्योगातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जनरल कन्सल्टंट्सच्या (GC) संघटनेची Louis Berger, Hill International आणि DB International ची नियुक्ती रद्द केली आहे.

जखमींपैकी 45 वर्षीय राजकुमार यादव यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन जखमींची स्थिती स्थिर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी तपासणीत संरचनात्मक जॉइंट्स, क्रॅक आणि सुरक्षा नियमांचे पालन तपासले जाणार आहे आणि त्रुटींवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाणार आहे.

“गेल्या अडीच वर्षांत विविध प्रकल्पांमध्ये या सल्लागारांना (DB-Hill-LBG) 150 हून अधिक नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांचे काम मंदगतीने सुरू असल्याबाबत वारंवार इशारे देण्यात आले होते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्राथमिक निष्कर्षानुसार, अपघाताच्या ठिकाणी कंत्राटदाराने GC च्या अनुपस्थितीत आठवडाभरापूर्वी सिमेंटच्या पॅरापेटचा एक भाग कापला होता आणि योग्य ‘क्युरिंग’ न झाल्याने तो नीट बसवला गेला नव्हता.

हा भाग यापूर्वी Reliance Infrastructure-Astaldi संयुक्त उपक्रमाने पूर्ण केला होता. मात्र विलंबामुळे 2022 मध्ये काम Milan Builtech कडे देण्यात आले. पुढे लहान एजन्सींना सब-कॉन्ट्रॅक्ट करण्यात आले. कंत्राटदारावर 5 कोटी दंड आणि GC वर 1 कोटी दंड ठोठावण्यात आला असून आवश्यक असल्यास तो वाढवला जाऊ शकतो.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जबाबदारी केवळ कंत्राटदारापुरती मर्यादित नसून साइटवरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी नियुक्त केलेल्या GC वरही आहे.

“प्राथमिक तपासात आढळले की योग्य देखरेखीशिवाय पॅरापेटचा भाग कापण्यात आला आणि त्या वेळी GC कर्मचारी साइटवर नव्हते,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे म्हटले, “GC ला तो भाग कधी कापला गेला हेही माहित नव्हते. नंतर त्यांनी कंत्राटदाराला थांबवण्यास सांगितल्याचा दावा केला. पण कोणी यावर विश्वास ठेवणार? जबाबदारी डिझाइन टप्प्यापासून सुरू होते.”

अपघाताच्या ठिकाणी एकूण आठ पॅरापेट बसवले गेले होते; त्यापैकी सात जुने होते आणि एक आठवडाभरापूर्वी बसवले गेले होते. “11 तासांनीही GC ला याची माहिती नव्हती किंवा साइटवर कर्मचारी नव्हते,” असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पॅरापेट कापण्यामागचे कारण तोडफोड की निष्काळजीपणा हे निश्चित करण्यासाठी पोलीस आणि प्राधिकरण दोन्ही तपास करणार आहेत.

MMRDA ने पुढे सांगितले की सर्व मेट्रो साइट्सवर CCTV बसवलेले असून ते iPad द्वारे दूरस्थरीत्या पाहता येतात, त्यामुळे ‘वॉर-रूम’ वापरात नाही. तरीही GC पर्यवेक्षकाची साइटवर प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या कंत्राटदार आणि सल्लागारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी एका अभियंत्याच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय सेल स्थापन करण्यात आला आहे.

जॉइंट आणि क्रॅक यातील फरक समजावण्याचा उपक्रम

लोक अनेकदा जॉइंट्सना क्रॅक समजून फोटो काढून घबराट निर्माण करतात, त्यामुळे विविध संरचनात्मक जॉइंट्सबद्दल जनजागृती करण्याचा MMRDA चा मानस आहे. “लोक जॉइंट्सना भेगा समजतात. सोशल मीडियाद्वारे आम्ही याबद्दल माहिती देऊ, जेणेकरून अनावश्यक घबराट टाळता येईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


हेही वाचा

मुंबईत डिसेंबरपासून वॉटर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या