केईएम रुग्णालयात नर्स, सुरक्षारक्षकांवर हल्ला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील केईम हॉस्पीटलमध्ये (KEM Hospital) रुग्णाच्या नातेवाईकांकडून नर्स आणि सुरक्षारक्षकांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन करत सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, रुग्णाच्या कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार सुरू झाला. त्यानंतर परिस्थिती हिंसक बनली. आरोपींनी नर्स आणि ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकांवर हल्ला केल्याने रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या वारंवार घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.


हेही वाचा

ठाण्यात 900 खाटांचे अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल

पुढील बातमी
इतर बातम्या