फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर, यांना अभय कुणाचा?

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबईत प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी याच महापालिकेच्या नाकावर टिच्चून दादर रेल्वे स्थानकासमोरच फेरीचा धंदा करत फेरीवाले प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांमधून भाजी, फळं आणि इतर साहित्य विकलं जात आहे. त्यामुळे एकाबाजूला प्लास्टिक बंदीच्या नावावर दुकानदारांना धमकावणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अनाधिकृत फेरीवाल्यांना अभय दिलं जातं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या