मुंबईवर होऊ शकतो ड्रोन हल्ला?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - नेहमीच मुंबई ही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असते. या वेळी मुंबईवर ड्रोन, रिमोट कंट्रोल मिसाईल आणि पॅराग्लाइडरच्या सहाय्याने हल्ला होऊ शकतो. स्वत: मुंबई पोलिसांनी ही शक्यता वर्तवली आहे.

मुंबई पोलिसांनी एक सर्क्युलर काढून मुंबईकरांना धोक्याचा इशारा दिला आहे. 31 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान हा हल्ला होऊ शकतो, असे पोलिसांनी या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे. "या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई परिसरात ड्रोनला बंदी घालण्यात आल्याचं या परिपत्रकात डिसीपी ऑपरेशन्स अश्विनी सानप-देवधर यांनी म्हटले आहे. त्यामुळे ड्रोन, रिमोट कंट्रोल मिसाईल आणि पॅराग्लाइड उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर कुणी याचे उल्लंघन करत असेल तर अशा व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांच्या ड्रोन वापराला मात्र या परिपत्रकातून सूट देण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या