लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपरमध्ये येणार आहेत. बुधवारी नाशिक आणि कल्याणमध्ये पंतप्रधानांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, सायंकाळी घाटकोपरमध्ये रोड शोसुद्धा पार पडणार आहे.
15 मे 2024 रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात होणाऱ्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. रोड शोसाठी घाटकोपरला येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आधी दिंडोरी आणि नंतर कल्याण येथे सभेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मुंबईत येत असल्या कारणानं शहरातील वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
वाहतुक शाखेच्या निर्णयानुसार शहरातील पुढील रस्त्यांवर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.
कुठे वाहतूक बंद?
'हे' आहेत पर्यायी मार्ग
1. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
2. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे
3. अंधेरी-कुर्ला रोड
4. साकी विहार रोड
5. MIDC सेंट्रल रोड
6. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR)
7. सायन- वांद्रे लिंक रोड
8. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR)
वाहतूक बंद असेल त्या वेळेत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे, अंधेरी-कुर्ला रोड, साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), सायन बांद्रा लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
हेही वाचा