12 ऑगस्टला कनेक्टिंग लिंक 3 तास बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकवर बुधवारी, 12 ऑगस्ट रोजी देखभाल, दुरुस्ती आणि रोड मार्किंगचं काम करण्यात येणार आहे.

या कामामुळे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक वळवणार

दुरुस्तीच्या कालावधीत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या घाट मार्गावरून मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

त्यामुळे या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई-पुणे मार्ग मात्र सुरू राहणार

दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या दिशेचा कनेक्टिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे दिशेतील वाहतुकीवर या कामाचा परिणाम होणार नाही.

दुरुस्ती आणि रोड मार्किंगचं काम सुरू असताना वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मदतीसाठी हेल्पलाइन

वाहतूक वळवताना काही अडचण आल्यास वाहनचालक मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे कंट्रोल रूम – 9822481224 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

तसंच हायवे पोलिस विभाग – 8433481234 या क्रमांकावरही मदत घेता येईल.

ही वाहतूक व्यवस्था केवळ 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या तीन तासांच्या दुरुस्ती कालावधीसाठी लागू राहणार आहे.


हेही वाचा

सरकारी वाहनांसाठी RTO स्पेशल नंबरवर सरकारी पैसा खर्च करता येणार नाही

पुढील बातमी
इतर बातम्या