विक्रोळीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुसळधार पावसामुळे विक्रोळीतल्या वर्षानगर इथल्या इमारतीच्या कंमपाऊंडचा काही भाग कोसळला. यामध्ये १ एकाचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी ही घटना घडली.

कमपाऊंडची भिंत जवळच्याच तीन घरांवर कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. गोपाल शंकर (३६), छाया गोपाल जनगम (३൦) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. कल्याणी जनमन (२) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. हे चौघे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या