Mumbai Rains घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळले, 7 जण जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे.

वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण माहिती मिळतेय की, यात 7 जण जखमी झाले आहेत. 

घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळला असून त्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू झालं असून आतापर्यंत सात जखमींनी यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या होर्डिंगखाली चार ते पाच गाड्या अडकल्याची माहिती आहे. 


हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प

पुढील बातमी
इतर बातम्या