हवामान खात्याचा दिलासा! 23 जूनपासून मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 23 जून (शुक्रवार)पासून मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारपट्टी भागात सक्रिय होईल. मराठवाड्यातही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल.

२२ जूनला मुंबईत मध्यम तर २३ व २४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावलेली नाही. मात्र, येत्या चार दिवसांत वातावरणात बदलाचे संकेत हवामान खात्याने दिले असून राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील जवळपास सर्वच भागांत येत्या चार दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात उष्णतेच्या लाटा कायम असल्या तरीही २३-२४ जूननंतर विदर्भालादेखील उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. येथेही मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २४ जूनला कोकणात मूसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढच्या दोन दिवसांत म्हणजेच 24- 25 जून अर्थात शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर अधिक असेल. सध्याच्या घडीला मोसमी वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्या कारणानं राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पूर्णपणे स्थिरावेल अशी माहिती स्पष्ट करण्यात आली. 

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातदेखील हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वर्तवण्यात अला असून, राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या