शनिवार-रविवार मुंबईत पाऊस कोसळणार, यलो अलर्ट जारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शनिवार सकाळपासून मुंबईतील अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हेजरी लावली. शनिवार सकाळपासून पाऊस सुरू आहे. 23 जून रोजी सायंकाळनंतर पावसाच्या ढगांनी मुंबईसह बऱ्याच भागांमध्ये दाटी करण्यास सुरुवात केली आणि अखेर पावसाची सुरुवात झाली. 

फक्त मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील काही भाहातही पाऊस झाला. चेंबूर, सांताक्रूझ लिंक रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, बांद्रा या भागात पाऊस सुरू आहे. तर तिथे पालघरमध्येही रिमझिम पावसानं हजेरी लावली. 

23 ते 28 जून दरम्यान राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

MMR, रायगडमध्ये सोमवारपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील, असा अंदाज वर्तवला आहे. 

साधारणपणे पुढील आठवड्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस सुरू होईल आणि किमान 30 जूनपर्यंत सुरू राहील

मुंबईत मान्सून वारे दाखल झालेले  नाहीत. त्यामुळं सध्या सुरु असणारा पाऊस हा मान्सून पूर्व असल्याचं आता स्पष्ट होत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळं येत्या काळात तो आणखी जोर धरेल अशीच शक्यता वर्तवली जातेय. 

२४ जूनच्या आसपास मान्सून मुंबई आणि कोकणातील अनेक भागात पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. 


पुढील बातमी
इतर बातम्या