मुंबईत बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी देखील हवामान खात्याकडून रेड अलर्टजारी करण्यात आला होता. यासोबतच शुक्रवारी देखील रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतील पावासाचा परिणाम रेल्वेवर झाला आहे.
पश्चिम रेल्वे २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारपासून सुरू झालेला पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याची माहिती मिळत आहे.
सखल भागात पाणी साचले असून त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. काही गाड्यांना उशीर झाला, तर अनेक स्थानकांवर पाणी साचले. मरीन लाइन्स स्टेशनचे व्हिज्युअल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा :
पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. यासोबतच मध्य रेल्वेची वाहतूकही 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ पाणी तुंबल्याने ट्रेनला विलंब. आठवडाभराहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai local train update)
भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरीय भागांसाठी शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. वाहतूक, लोकल ट्रेन आणि बस सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा