मुंबईत पुढील 48 तासांसाठी 'यलो अलर्ट'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रात (maharashtra) दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढत आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मान्सून (monsoon) भारतीय सीमेजवळ पोहोचला आहे. त्यामुळे तो केरळमध्ये कधीही प्रवेश करू शकतो. केरळ आणि तामिळनाडू राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा (rain updates) देण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यातील बहुतेक भागात पाऊस पडला. मंगळवार 20 मे रोजी राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि बुधवार 21 मे रोजी कोकणसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सून लवकरच भारतात येईल

19 मे रोजी मान्सून श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताकडे वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे हवामान खात्याने केरळ आणि तामिळनाडूसह किनारी राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. 20 मे रोजी भारतीय किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यामुळे पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यापूर्वीच अंदाज वर्तवला होता की मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये पोहोचेल. या वेगाने येणाऱ्या मान्सूनमुळे दक्षिण भारतासह संपूर्ण देशाच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

बुधवारी कोकणात रेड अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, बुधवार, 21 मे रोजी कोकण किनाऱ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा पाऊस 22 मे पर्यंत सुरू राहील आणि 23 मे नंतर पाऊस थांबेल असा प्राथमिक अंदाज आहे.

पुढील 48 तासांसाठी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई (mumbai), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, परभणी, बीड, हिंगोली, नानशिरव, हिंगोली, अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या