मुंबईत प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांमध्येअशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. मुंबईत दरवर्षी अशा 300 ते 350 गुन्ह्यांची नोंद होते. 

एमएचबी (MHB) पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि प्युअर ॲनिमल लव्हर फाउंडेशनचे संस्थापक सुधीर कुडाळकर, म्हणाले, “प्राण्यांच्या कल्याणासाठी कायद्यांबाबत जागरूकता महत्त्वाची आहे. प्राण्यांच्या क्रूरतेबाबत कायदे आहेत, पण हे जामीनपात्र गुन्हे आहेत.” 

काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या (kandivali) लोखंडवाला इथे दोन प्रकरणे समोर आली होती. एका कार चालक कुणाल रुपाणीने एका पिल्लाला चिरडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर एका ऑटो चालकावर पाळीव कुत्र्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे विलेपार्ले (vile parle) येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बेकायदेशीर हॉर्स रेसिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हिडीओ व्हायरल होताच, पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) ने तक्रार दाखल केली, ज्यात गाड्या हाकण्यासाठी घोड्यांना क्रूरपणे चाबकाने कसे मारले गेले हे समोर आणले गेले.

रस्त्यावरील कुत्र्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याचप्रमाणे वांद्रे (Bandra) पोलिसांनी पशुवैद्य ज्योत्स्ना जागराणी यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींवर तीन मांजरांची हत्या आणि दोन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. एका प्रकरणात कुत्र्याला मारण्यासाठी 4,500 रुपयांची सुपारी देण्यात आली होती.


हेही वाचा

दहावी आणि बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार

राणी बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय आणि उद्यान

पुढील बातमी
इतर बातम्या