मुंबईकरांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी अनुभवता येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

येत्या काही दिवसात नागरिकांना डिसेंबरमधील थंडी अनुभवता येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

‘मंदौस’ चक्रीवादळामुळे यंदा डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात थंडी अनुभवता आली नाही. आता चक्रीवादळाचा परिणाम पूर्णपणे ओसरल्यानंतर आणि उत्तर भारतात एकापाठोपाठ एक पश्चिमी झंझावाताच्या परिणामामुळे राज्यातील किमान आणि कमाल तापमानात हळूहळू घसरण होत आहे.

मात्र सरासरी तापमानापेक्षा ते दोन अंशाने अधिक आहे. यात घसरण होणार असून रात्रीच्या थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून संपूर्ण राज्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन १० अंश सेल्सिअसपर्यंत तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन २९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यातील उर्वरित दिवसात थंडीत वाढ होईल आणि ती डिसेंबरअखेपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे.

तसेच थंडीचा परिणाम राज्यासह दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशातही जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.


हेही वाचा

डिसेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’!

पुढील बातमी
इतर बातम्या