शनिवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय हवामान खात्याच्या (IMD) गुरुवारच्या हवामान अंदाजानुसार, शुक्रवारी राज्यात येलो अलर्ट (हलका ते मध्यम पाऊस) आणि शनिवारी ऑरेंज अलर्ट (मुसळधार ते अति मुसळधार पाऊस) दिला आहे. 

शुक्रवारी, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट (अत्यंत मुसळधार पाऊस) जारी करण्यात आला आहे, तर रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट असेल.

शनिवारी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईमध्ये अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार, पहिल्या आठवड्यात 13 ते 19 जून) दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणात तसेच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात (20 ते 26 जून) उत्तर मध्य महाराष्ट्र व कोकणात तसेच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तिसऱ्या आठवड्यात (27 जून ते 3 जुलै) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्यानंतर चौथ्या आठवड्यातही (4 ते 10 जुलै) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल विदर्भात मात्र या कालावधीत सरासरीइतक्या किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.


हेही वाचा

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेचे नवीन अ‍ॅप

पुढील बातमी
इतर बातम्या