29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर (Mayor Reservation Mahanagarpalika Marathi News) करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. (Maharashtra Municipal Corporation Reservation 2026)

50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे.

महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती.

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-

अनुसूचित जमाती - 1 

अनुसूचित जाती - 3 

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - 8 

सर्वसाधारण - 17

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

1. छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण  (महिला)

2. नवी मुंबई: सर्वसाधारण

3. वसई- विरार: सर्वसाधारण

4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती

5. कोल्हापूर: ओबीसी

6. नागपूर: सर्वसाधारण

7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)

8. सोलापूर: सर्वसाधारण (महिला)

9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)

10. अकोला: ओबीसी (महिला)

11. नाशिक: सर्वसाधारण

12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण

13. पुणे: सर्वसाधारण

14. उल्हासनगर: ओबीसी

15. ठाणे: अनुसूचित जाती

16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)

17. परभणी: सर्वसाधारण

18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )

19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण

20. मालेगाव: सर्वसाधारण

21. पनवेल: ओबीसी

22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण

23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण

24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण

25. जळगाव: ओबीसी (महिला)

26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)

27. धुळे: सर्वसाधारण (महिला)

28. जालना: अनसूचित जाती (महिला)

29. इचलकरंजी:  ओबीसी

पुढील बातमी
इतर बातम्या