डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
वाहतूक सुरळीत राहावी, गर्दीचे व्यवस्थापन आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन दादरमधील शिवाजी पार्क परिसरात काही रस्ते बंद, काही मार्ग एकमार्गी तर काही ठिकाणी नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे.
वन वे:
एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंत एकमार्गी करण्यात आला आहे.
रस्ते बंद:
एस. व्ही. एस. रोड हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शनदरम्यान सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. (स्थानिक रहिवाशांना रोड क्रमांक ५ मार्गे प्रवेश दिला जाईल.)
रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
ज्ञानेश्वर मंदिर रोड हा एस. व्ही. एस. रोड जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यंत बंद असेल.
नो-पार्किंग झोन:
वीर सावरकर मार्ग (सेंच्युरी जंक्शन ते येस बँक जंक्शन)
रानडे रोड
केळुसकर रोड (दक्षिण आणि उत्तर)
ज्ञानेश्वर मंदिर रोड
पर्यायी पार्किंग व्यवस्था:
सेनापती बापट मार्ग (माहीम ते दादर)
इंडिया बुल्स फायनान्स सेंटर
कोहिनूर स्क्वेअर पीपीएल
कोहिनूर मिल कंपाऊंड
कामगार स्टेडियम
माटुंग्यातील फाइव्ह गार्डन्स
हे निर्बंध मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा